Devendra Fadnavis on BJP-MNS Alliance : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी भाजपला पूरक ठरतील अशा भूमिका अनेकदा घेतल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात […]
प्रफुल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) या नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या महिला मोर्चाला त्या मार्गदर्शन करणार असल्याचं बोलले जात आहे. पण यावर ठाकरे गटाकडून अजूनही यावर दुजोरा दिला गेलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे अनेक आमदार […]
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आपल्या कार्यालयात ‘एसी’ची (एअर कंडीशनर) थंड हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. अधिकारात नसतानाही परस्पर आपल्या दालनात एसी बसविणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत आयुक्त कार्यालयाने जळगावसह, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. आयुक्तांनीही या प्रकाराची दखल घेतल्याने अधिकाऱ्यांकडून […]
Nitin Gadkari Threat Case : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हा लष्कर-ए-तोयबा, दाऊद आणि पीएफआय या संघटेच्या संपर्कात होता. पोलिसांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे त्याच्याकडून होत आहेत. त्यात नितीन गडकरी धमकी प्रकरणाचे धागेदोरे सिमेपलीकडे असल्याची माहिती मिळत आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. अमितेशकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा […]
विदर्भात काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी खासदार अनंत देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अऩंत देशमुख यांचा मुलगा नकूल देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केलाय. Eknath Shinde […]
Sharad Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली […]