Bhaskar Jadhav On Rahul Narwekar : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन […]
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. […]
मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात […]
“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे.” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही योजना जाहीर केल्या आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. […]
मुंबई : खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत या प्रकाराचा जाब विचारला आहे. अजित पवार यांनी शेतकरी हीच आमची जात आहे, असे सांगत सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकारावरुन उठलेल्या गदारोळानंतर आता कृषी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा : ई पॉस मशीनवरुन […]
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर येथे या नामांतराचा काही समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल ९ मार्चला शहरात परवानगी न घेता कँडल मोर्चा काढला होता. पोलिसांची परवानगी नसल्यामुळे हा कँडल मोर्चा बेकायदेशीर होता त्यामुळे शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात गुन्हा […]