पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते.
मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. मला बोलायला लावू नका. तुमची उरलीसुरली राहू द्या, अशा शब्दांत ठाकरे गटाचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
Mumbai Riots 1992: 1992 मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीतील खटले लवकरात लवकर निकाली काढा, असे निर्देश आज राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले