अहमदनगर – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भावनावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले व यावेळी पोलीस व युवांमध्ये संघर्ष देखील झाला. पोलिसांनी (Police) यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. […]
Parliament Attack On Rahul Narvekar: संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. संसदेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले असून, ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष […]
मुंबई : मंत्रीपदाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर काही जबाबदारी येते. आपल्याला काही बोलायचे असेल तर आपण आवश्य बोला. पण पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर जावून मग आपण वाटेल ते बोला. तुम्ही मंत्रिमंडळात राहून या गोष्टी करु शकत नाही, असे खडे बोल सुनावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) भर सभागृहात मंत्री छगन […]
Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
मुंबई : राज्यभरातील मराठा समाजाच्या (Maratha) कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती (Shinde Committee) हैदराबादमधून रिकाम्या हातानेच परतली आहे. शिंदे समितीला हैदराबादमधील कोणत्याही कागदपत्रांवर जातीचा उल्लेख आढळून न आल्याने कुणबी नोंदी सापडलेल्या नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात आढळलेल्या 28 हजार नोंदीसह शिंदे समितीचे काम पूर्ण झाले आहे. ही समिती येत्या […]
Onion Export Ban : केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातबंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतला. या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रणात येऊन ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी थेट दिल्लीत गळ्यात […]