ज्यांनी कधी राष्ट्रगीत गायलं नाही अन् राष्ट्रध्वज फडकवला नाही त्यांनी वंद मातरमवर चर्चा करावी का?
'सेवा मंदिराचे दरवाजे' बंद आहेत. अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून दिली.
आज लोकसभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा झाली. (Delhi) या चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती वार केले. ते म्हणाले आज वंदे मातरमचं कौतुक करणारे लोक, ज्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे कार्यालयावर कधीही राष्ट्रगीत गायले नाही किंवा तिरंगा ध्वज फडकवला नाही असा थेट हमला त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर डॉ. हेडगेवार आणि गुरु गोळवलकर यांच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवावा, असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर पंतप्रधान ‘आत्मनिर्भरते’ची स्तुती करत असले तरी, देशातील कोणतीही संस्था न्यायव्यवस्था, सीबीआय, आयकर, ईडी, निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर नाही आणि ‘आत्मभान’ राखून काम करत नाही. ज्या मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तिथे लोकांना न्यायाची मागणी करावी लागत आहे असंही ते म्हणाले.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील बेळगाव-कारवार-निपाणी येथे 60 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे आणि तेथील नागरिकांना अटक केली जाते, त्यामुळे ‘वंदे मातरम’चा नारा देण्यासाठी आणि आत्मभान ठेवून काम करण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेची लढाई लढावी लागेल असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसंच, संविधानाच्या ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ला होत आहे. एकही संस्था स्वतंत्र राहिलेली नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्याची लढाई पुन्हा एकदा लढावी लागेल.
Video : मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू देशासाठी तुरुंगात; प्रियंका गांधी थेट नडल्या
कार्यालयांची नावे बदलून काही होणार नाही, कारण ‘सेवा मंदिराचे दरवाजे’ बंद आहेत. अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नंदुरबार येथील 14 वर्षीय शिरीष कुमारवर 1942 च्या आंदोलनात तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ म्हणत असताना इंग्रजांच्या पोलिसांनी गोळी मारून ठार केले. 1942 मध्ये मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाल्यानंतर अरुणा असफ अली यांनी तिरंगा घेऊन व्यासपीठावर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा नारा दिला होता.
सपा खासदार अखिलेश यादव म्हणाले की, सत्ता पक्षाचे लोक प्रत्येक गोष्टीवर मालकी हक्क दाखवू इच्छितात. जे महापुरुष त्यांचे नाहीत, किंवा ज्या गोष्टी त्यांच्या नाहीत, त्या ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. भाजपचे किती नेते आज किती धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी आहेत, हे त्यांनी सांगावे. भाजपच्या स्थापनेवेळी राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या भाषणात समाजवादी विचारधारेचा आणि सेक्युलर मार्गाचा स्वीकार केला होता, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी टोला लगावला.
भाजपने आपल्या मंचावर जयप्रकाशजींचे फोटो लावून लोकांना असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ते जेपींच्या मार्गावर चालतील. वंदे मातरम केवळ गाण्यासाठी नाही, तर निभावण्यासाठी देखील असले पाहिजे. वंदे मातरमने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वांना जोडले, परंतु आजचे भेद पाडणारे लोक त्याच गोष्टीने देशाला तोडू इच्छितात. अशा लोकांनी पूर्वीही देशाशी दगाबाजी केली आणि आजही करत आहेत.
वंदे मातरम हा दिखावा किंवा राजकारणाचा विषय नाही. जेव्हा सत्ता पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकतो, तेव्हा असे वाटते की वंदे मातरम त्यांनीच तयार केलेले गाणे आहे. ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भागच घेतला नाही, ते वंदे मातरमचे महत्त्व काय जाणणार. हे लोक वंदे मातरम मनापासून बोलत होते, तर काही लोक त्याच स्वातंत्र्यप्रेमींविरुद्ध इंग्रजांसाठी जासूसी आणि मुखबरीचे खबरी देण्याचे काम करत होते, असा हल्लाबोल त्यांनी केला.
