राऊतांनी मायक्रो प्लॅन फोडताच आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा; नेमकं काय म्हणाले राऊत?

नाशिक : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर काल (दि.28) बैठक पार पडली तर, आज (दि.1) खासदारांची बैठक झाली. यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगत आम्ही या पदासाठी दावा सांगणार असल्याचे राऊतांनी सांगितले. मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी नाशिक दौऱ्यावर आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेविषयी माहिती नाही, असं संजय राऊत म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On VidhanSabha Opposition Leader)
अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?; शिंदेंच्या विधानावर बोलताना दादांनी घेतलं फडणवीसांचं नाव
काय म्हणाले राऊत?
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आगामी काळात अधिवेशन होणार असून, त्या संदर्भात दिशा मिळावी यासाठी काल मातोश्रीवर बैठक पार पडल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेचं बळ 20 आमदारांचं आहे. याआधी याहून कमी संख्या असतानाही विरोधीपक्ष नेतेपद मिळालेलं आहे, याकडे राऊतांनी लक्ष वेधत आम्ही या पदावर दावा सांगणार असून, विधानसभा अध्यक्षांना संविधानाविषयी चाड असावी त्यामुळे ते आमची भूमिका ते मान्य करतील.
महाकुंभाच्या व्हायरल आयआयटी बाबाला मारहाण; लाइव्ह शोमध्ये घडला धक्कादायक प्रकार
यावेळी राऊतांनी शिंदेंच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, शिंदेंच्या काळात भ्रष्टाचार झाले. आरोग्यमंत्री शिंदेंच्या पक्षाचे होते. त्यांच्या कार्यकाळातीलही भ्रष्टाचार समोर आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी त्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल. फडणवीस भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू असेही राऊत म्हणाले. जवळीक निर्माण करण्यासाठी आम्हाला फडणवीस किंवा भाजपचे कौतुक करण्याची गरज नाही. राज्यात ज्या उत्तम गोष्टी आहे त्याचे कौतुक केलं पाहिजे, हीच तर खरी लोकशाही आहे.
माजी मुख्यमंत्र्यांचा मेहुणा अन् अजितदादांची भेट, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, नांदेडात काय घडतंय?
कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर आज (दि.1) न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, कायद्याने माणिकराव कोकाटे हे अपात्र ठरले आहे. मात्र, आता त्यांची धडपड मंत्रीपद आणि आमदारकी वाचवण्यासाठी केली जात आहे. याआधी सुनील केदार, राहुल गांधी यांचे पद 24 तासात गेल्याची नोंद आहे. मात्र, कोकाटेंना अभय दिले जात असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.