श्रेयवादाचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडतो, सत्यजीत तांबेंचे खताळांना आव्हान

Satyajeet Tambe Exclusive Interview : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून संपूर्ण राज्याचे लक्ष

  • Written By: Published:
Satyajeet Tambe Exclusive Interview

Satyajeet Tambe Exclusive Interview : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून संपूर्ण राज्याचे लक्ष अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्याकडे लागले आहे. संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ आणि विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्नी मैथिली तांबे तर आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या वहिनी सुवर्णा खताळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर गंभीर आरोप करत सत्यजीत तांबे मी केलेल्या कामाचा श्रेय घेत असल्याचं म्हटलं आहे. तर आता लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी अमोल खताळ यांना प्रत्युत्तर देत जर अमोल खताळ यांनी एकही उदाहरण दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं म्हणत आमदार खताळ यांना आव्हान दिले आहे. या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना सत्यजीत तांबे यांनी संगमनेरकांसाठी व्हिजन सांगत अमोल खताळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लेट्सअप मराठीला दिलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले की, जर अमोल खताळ यांनी आणलेल्या निधीवर मी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्याचं एकही उदाहरण आमदार अमोल खताळ यांनी दाखवलं तर मी राजकारण सोडून देईल आणि कधीही राजकारणात परतणार नाही असं म्हटलं आहे. कागदपत्र खोटे बनवायचे आणि कुठे तरी आम्ही ती मागणी केली असं म्हणायचे, तुम्ही पैसे आणले ना, आज त्यांनी भोजापूर चारीला 40 कोटी रुपयांचा निधी आणला पण मी त्यात श्रेयवाद घेतला नाही. त्यांनी 10 कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी आणला मात्र आतापर्यंत तो निधी आलेला नाही. निवडणूक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी शहरात त्या निधीबाबत बोर्ड लागले होते पण मी त्याचा श्रेयवाद घेतले नाही. मी कधीही नाही बोललो की हा निधी मी आणला आहे. जो निधी तुम्ही आणला आहे तो निधी तुम्ही आणला आहे आणि जो निधी मी आणला आहे तो निधी मी आणला आहे. त्याच्यात श्रेयवादाचे काही कारण नाही. मी कधीही दुसऱ्याचा श्रेय घेत नाही. मी श्रेय देणाऱ्यातला आहे असं या मुलाखतीमध्ये बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

Pankaja Munde PA Anant Garje : पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीची आत्महत्या, मुंबईत जीवन संपवलं

तसेच आम्ही संगमनेर शहराला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे ही निवडणूक आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असं देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्ट केले.

follow us