शाळेला देणार संतोष देशमुखांचं नाव, पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेने घेतला मोठा निर्णय!

शाळेला देणार संतोष देशमुखांचं नाव, पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेने घेतला मोठा निर्णय!

school will be named Santosh Deshmukh, statue also erected educational institutions decision : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे तसेच मागण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे तसेच यामध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बाळ नांगर यांनी देखील एक पुढाकार घेतला. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे नाव विजयसिंह बाळ नांगर यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एका माध्यमिक शाळेला देण्याचे ठरवलं आहे. सामाजिक सलोखा वाढीसाठी आपण हा निर्णय घेतल्याचं बांगर यांनी सांगितलं.

कुराण अन् मांसाहाराचीही मागणी, तहव्वुर राणाच्या याचिकेवर एनआयएला न्यायालयाची नोटीस

सोमवार 21 एप्रिल रोजी बांगर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली या सांत्वन पर भेटीमध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एका शाळेला स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देणार असल्याचे माहिती दिली. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला तसेच या शाळेच्या प्रांगणामध्ये देशमुख यांचा पुतळा देखील उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

‘जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा’; झिशान सिद्धीकींना जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी

या अगोदर केज तालुक्यातील आडस या गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना कनिष्ठ लिपिक पदाची ऑफर दिले होती.आडसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह देशमुख यांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना थेट नियुक्तीपत्र दिलं होतं. तर याचवेळी दुसरीकडे अश्विनी देशमुख यांना सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube