“सरकारची झाली दैना, तिकडं नाही चैना-मैना”; ठाकरेंचा भुजबळांच्या आडून तिरका बाण

“सरकारची झाली दैना, तिकडं नाही चैना-मैना”; ठाकरेंचा भुजबळांच्या आडून तिरका बाण

Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सध्या छगन भुजबळांच्या नाराजीचा मुद्दा जास्त चर्चेत आहेत. छगन भुजबळ यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रश्न मंत्रि‍पदाचा नव्हता तर पक्षात माझी अवहेलना झाली हा होता. मंत्रिपद कुणी नाकारलं याचाही शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता भुजबळ पुढे काय भूमिका घेणार याचा खुलासा झालेला नाही. यातच आता उद्धव ठाकरेंनीही भुजबळांच्या नाराजी नाट्यावर मिश्किल भाष्य केलं आहे. सरकारची झाली दैना. त्याच्यामुळं तिकडं चैना-मैना काही होणार नाही. त्यामुळे वहां नहीं रहना हेच योग्य आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर खोचक टीका केली. ठाकरे म्हणाले, छगन भुजबळांबरोबर जे झालं त्याचं वाईट वाटतं. त्यांच्या प्रमाणेच अनेकांबरोबर असं घडलं आहे. अनेकांची जॅकेट वाट पाहत होती. ती आता तशीच राहणार आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. लाडका आमदार अशी काही योजना आहे का? तशी योजना सरकारने करावी. सरकारची झाली दैना. त्यामुळे आता तिकडं चैना मैना काही होणार नाही. त्यामुळे त्यांचे वहां नहीं रहना हेच योग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण.. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य

लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या

लाडक्या बहि‍णींना न्याय देण्याऐवजी सध्या सरकारमध्ये लाडके आणि नावडते आमदार चर्चेत आहेत. पण, सरकारने आता अटी बाजूला ठेवाव्यात आणि राज्यातील लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये तत्काळ द्यावेत. सरकारकडून पैसे देताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

लोकशाहीमध्ये मी माझं मत कोणाला देतोय, हे समजलं पाहिजे. तो अधिकार आता हरवला जात आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? असा सवाल देखील ठाकरेंनी केलाय. की केवळ मंत्रीपद बदलून आपल्या खुर्च्या बळकट करणार आहात आणि बाकीच्यांना खेळवणार आहात, असं देखील उद्धव ठाकरे यांनी विचारलं आहे. एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, लोकांचा गैरसमज दुर करा असं ते म्हणाले आहेत.  भुजबळ अजून संपर्कात नाहीत, परंतु अधूनमधून त्यांच्याशी संपर्क होत असतो, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Video : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube