धुळ्यात शीख धर्मगुरुंवर तलवारीने प्राणघातक हल्ला; हल्ल्यात धर्मगुरूंसह एक जण गंभीर जखमी
धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये एक खळबळजनक घटना. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर सकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला.
Sikh religious leaders attacked with swords : धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गाववर असणाऱ्या मोहाडी परिसरातील गुरुद्वारामध्ये एक खळबळजनक घटना घडली. या गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग (Baba Dheeraj Singh) यांच्यावर आज सकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. उमेश नावाच्या एका सेवेकऱ्यानेच त्यांच्या डोक्यात आणि मानेवर तलवारीने वार करत प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे धुळे (Dhule) शहरातील शीख बांधवांमद्धे खळबळ उडाली आहे. बाबा धीरजसिंग हे गुरुद्वारामध्ये वर्तमानपत्र वाचत असताना नाशिक (Nashik) येथील सेवेकरी उमेश हा तिथे आला आणि त्याने बाबा धीरजसिंग यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. हा हल्ल्यात बाबा धीरजसिंग यांना वाचवण्यासाठी आलेल्या रणबीर सिंग यांच्यावर देखील हल्लेखोराने वार केले असून ते देखील गंभीर जखमी झाले आहेत.
आमदार कटकेंच्या गाडीची चार वर्षीय चिमुकलीला धडक; प्रकृती चिंताजनक!
हल्ल्यात शीख धर्मियांचे धर्मगुरू बाबा धीरजसिंग आणि रणबीरसिंग हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे समजू शकलेलं नाही. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक अजय देवरे यांच्यासह स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बाबा धीरजसिंह यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेची चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
