देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

Uddhav Thackeray : आज देशभरात विरोधी लाट जी आली ती आणीबाणीनंतर आलेली ही पहिली लाट असेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनता आता भाजपच्या विरोधात गेली आहे असा मोठा दावा केला आहे. (Uddhav Thackeray) ते अमरावतीत प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष (Sharad Pawar) शरद पवार, माजी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. (Amravati Loksabha) दरम्यान, बाळासाहेबांचा शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाही. विश्वासघात करणाऱ्यांच्या बाजूने शिवसैनिक कधीच उभा राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

स्वातंत्र लढ्याशी काडीचा संबंध नाही

आज जे सत्तेवर बसले आहेत त्यांचा स्वातंत्र लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता. कधीच आणि कसलाच यांचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी संबंध नाही असा थेट प्रहार उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केला. तसंच, 10 वर्षात अगदी देशातील जनतेला यांनी लुटलं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हमला केला. त्याचबरोबर तुम्ही या 10 वर्षात काय केलं याचा हिशोब द्या मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ असा थेट सवालं उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केलाय.

 

ही राजवट तुम्हाला पुन्हा पाहिजे का?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तुमच उत्पन्न दुप्पट झालं का ? असा प्रश्न विचारला तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी नाही असं उत्तर दिलं. तसंच, जीएसटीच्या माध्यमातून आपलाचं खिसा कापून आपल्याला भिक देतात आणि हे भाजपवाले मदत केल्याचा आव आणतात अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपवर टीका केली. त्याचबरोबर असली ही राजवट तुम्हाला पुन्हा पाहिजे का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना यावेळी विचारला.

 

संविधान बदण्याचा विचार

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केलं की, आपल्याला सर्व काही मतभेद विसरून लढायच आहे. कारण आपण यावेळी एकत्र आलो नाही तर आपण करंटे ठरू. यावेळी भाजपवाल्यांना आता 400 पार जागा पाहिज्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडक यांनी देशाला दिलेलं संविधान बदलण्यासाठी असा थेट आरोपच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय. दरम्यान, आपल्यातले दुसरीकडे गेले असतील किंवा काही वेगळी भूमिका घेतली असेल तर आपण सरळ सांगा आम्ही यावेळी आपलं नाही तर फक्त इंडिया आघाडीचंच काम करणार आहोत आणि आम्हाला साथ द्या असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांसमोर केलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube