गद्दारांचे बाप दिल्लीतून मोरारजी देसाईंप्रमाणे मुंबईचं महत्त्व कमी करताय; ठाकरेंचा मोदी-शाहंवर हल्ला

गद्दारांचे बाप दिल्लीतून मोरारजी देसाईंप्रमाणे मुंबईचं महत्त्व कमी करताय; ठाकरेंचा मोदी-शाहंवर हल्ला

Uddhav Thackeray Criticize PM Modi and Amit Shah in Hatkanagale : राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यानच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांनी गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Pushpa 2 चं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. मात्र आता सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत. त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. हे वखवखलेले आत्मे महाराष्ट्रात फिरू कसे शकतात. तसेच गेल्या वेळी या मतदारसंघांमध्ये मी ज्या धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली होती. मला वाटलं होतं. नावाप्रमाणे ते धैर्यवान असेल मात्र एवढा धैर्य हरणारा माणूस मी पाहिला नव्हता. मात्र त्यांनी केलेली गद्दारी ही केवळ माझ्यासोबत नाही तर ज्या मोदींसाठी मी मत मागितली होती. त्यांनी देखील गद्दारी केली आहे. त्यामुळे डबल गद्दारी झाली असून त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो.

‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

सर्वोच्च न्यायालयाने देखील या लवादाचं कानफाट फोडलं आहे. मला गादीवरून खाली खेचला आणि स्वतः उडी मारून बसले. त्यांची पोर मंत्री झाले. ते चालतं मात्र ज्या कुटुंबाने सर्व काही दिलं. त्या शिवसेनाप्रमुखांचा पुत्र बसला त्याला खाली खेचलं. त्यांनी गद्दारी केलीच मात्र या गद्दारांचे बाप दिल्लीत बसले आहेत. गुजरात मधीलच असणारे मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांवर अमानुष गोळीबार केला होता.

मात्र मराठी माणूस आणि महिलांनी पुढे येत आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन ढोकळेबाज मुंबईचे महत्त्व कमी करायला निघाले आहेत. असं म्हणत या सभेत ठाकरे यांनी मोदी- शाह यांच्यासह राज्यातील एकनाथ शिंदे आणि आणदार अपात्रतेबाबत निर्णय देणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube