धक्कादायक! शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

धक्कादायक! शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Molestation Of School Girl : अकोल्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. (School Girl) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवणाऱ्या 52 वर्षांच्या व्यक्तीने 9 वर्षीय मुलीवर (Rape Case) अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. (Molestation) राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले असून, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ही समोर आली आहे.

मदतणीस म्हणून कार्यरत भीषण अपघात! कारची ट्रकला धडक; धुळे-सोलापूर महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

मुलगी घाबरली होती

आरोपी चंद्रमणी चव्हाण अनेक वर्षांपासून गुडधीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत आहे. 4 जून रोजी चव्हाण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत असताना त्याने एका 9 वर्षीय विद्यार्थ्यांनीला ज्या खोलीत खिचडी बनवली जाते तिथे नेले, त्या खोलीत आरोपीने विद्यार्थीनीचा विनयभंग केला. या घटनेनंतर मुलगी घाबरली होती आणि त्यामुळे सलग दोन दिवस ती शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता, मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.

एक अहवाल तयार केला मोठी बातमी : पुढील आदेशापर्यंत NEET UG समुपदेशन पोस्टपोन; SC च्या निकालानंतर निर्णय

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहचले तेव्हा तेथे मोठा गोंधळ झाला. या दरम्यान आरोपी चंद्रमणी चव्हाण शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला. सद्या या प्रकरणात सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. तसंच, जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube