मोठी बातमी , 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची सुरुवात, कोण मारणार बाजी?
Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे
Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आज 2 हजार 689 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष काही महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी किंवा युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून या निवडणुकीचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Elections) ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्याने राजकीय समीकरणे बदली असल्याने आता मुंबईत सत्ता कोणाची? याबाबत देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी- चिंचडव महापालिकासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCPSP) युती केल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेसाठी भाजप विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला धक्का, न्यूझीलंड 7 विकेट्सनी विजयी
मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, मनरेगाअंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र दाखवत तुम्ही मतदान करु शकतात.
