संभाजीराजेंचा मर्मी घाव म्हणाले, धनंजय मुंडेंना ‘बिटवीन द लाईन्स’ कळत नाहीत का?

संभाजीराजेंचा मर्मी घाव म्हणाले, धनंजय मुंडेंना ‘बिटवीन द लाईन्स’ कळत नाहीत का?

Kolhapur News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासात रोज नवीन माहिती समोर येत आहे. दुसरीकडे वाल्मिक कराड, आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. यानंतर विरोधकांकडून पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस यांनी तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आधीच केली आहे. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

“धनंजय मुंडेंनी दहशत केली, त्यांनाच पहिली अद्दल घडली पाहिजे” दमानियांचा घणाघात

संभाजीराजे पुढे म्हणाले, आता वाल्मिक कराडचा जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यातून हत्येत कराडचे कनेक्शन उघड झालं आहे. त्यामुळे आता कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच धनंजय मुंडे यांनीही मंत्रि‍पदावर राहून उपयोग नाही. मुंडे यांच्या बाबतीत सरकारने निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे काहीच संबंध नाहीत हे जाहीर करावं. मुंडेंनी स्वतःचं वटमुखत्यार पत्र कराडला दिलं आहे. इतके पक्के संबंध असताना सुद्धा मुंडे राजीनामा देत नाहीत. संबंध देशात या हत्या प्रकरणाची चर्चा होत आहे. तरी देखील तुम्हाला या खुर्चीवर का बसायचं आहे? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला. अजित पवार आणि मुख्यमंत्री मुंडेंना संरक्षण का देत आहेत हेच कळत नाही. याचंच आश्चर्य वाटतं असेही संभाजीराजे म्हणाले.

धनंजय मुंडे क्लिअर असते तर त्यांनी पालकमंत्रिपद दिलं गेलं असतं, बिटविन द लाईन्स मुंडेंना कळत नाही का? अजूनही सरकार न कळत वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देत आहे का? असे सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube