भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी

भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी

Suhas Kande criticism of Chagan Bhujbal :  निवडणुकीच्या मैदानात कोण कुणाचं काम करतो आणि कोण कोणती भूमिका घेतो याचा काही नेम नाही. नाशिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला आहे. (Nashik Lok Sabha) अशातच नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे.

 

व्हिडिओ आणि काही फोटो आहेत

राष्ट्रवादी पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत असं म्हणत कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करत असून त्याबाबतचे व्हिडिओ आणि काही फोटोही माझ्याकडे आहेत असंही कांदे यावेळी म्हणाले आहेत.

 

तुतारीचा प्रचार करत राहा

तम्ही महायुतीमधून मंत्रीपद मिळवलं. आता काम करायच्या वेळी तुतारीचा प्रचार करत आहात. जर आपल्याला एव्हढाच तुतारीचा पुळका असेल तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचा प्रचार करत राहा असा थेट घणाघात कांदे यांनी भुजबळ यांच्यावर केला आहे.

 

भुजबळांच प्रतिउत्तर 

कांदे यांच्या या आरोपांना छगन भुजबळ यांनीही उत्तर दिलं आहे. आमदार काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आरोप केलेले आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यातील वाद काही नवीन नाही. त्यांच्यात या अगोदरही अनेकदा खटके उडालेले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज