पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे पंच असलेले मारुती सातव यांना धमकीचा फोन आला आहे. यासंदर्भात स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भोंडवे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ’10 ते 14 जानेवारी दरम्यान कोथरूड येथे 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये […]
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे इटकेलवार, काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबोले, […]
औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीची छेडछाड केल्याचा आरोपाखाली रविवारी अटक केली होती. आज पोलिसांनी त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात […]
कोल्हापूर : ईडीनं काही दिवसांपूर्वी मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. रजत प्रायव्हेट आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरुन 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काहीच बोलत नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट […]
मुंबई : राज्यभर गाजलेल्या 30-30 घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्यात. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची […]
मुंबई : नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर शुभांगी पाटील या देखील निवडणुकीत उभ्या राहिल्या. […]