छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करत होता.
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
मराठा आंदोलक यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चौकशी झाली. त्यामध्ये फडणवीसांनी एसआयटी रद्द केल्याचं म्हटलं आहे.
मुंबईत विजय नगर परिसरात अपघाती घटना घडली. येते घराचे छत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजाचा आमच्याविरोधात असंतोष दिसून आला. खरं तर मराठा समाजाला काय दिले हे सांगण्यात आम्ही कमी पडलोय.
बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.