मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात Maharashtra State Road Development Board च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अखेर राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी आता अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या सेवा काळात मोपलवार अनेकदा वादात सापडले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. मात्र क्लिनचीट मिळाल्याने ते एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक […]
मुंबई : कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट अर्थात टीआरपी (TRP) घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना शिंदे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने हा खटलाच मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दाखल खटला मागे घेण्याच्या परवानगीसाठी पोलिसांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला आहे. या याचिकेवर न्यायालयात येत्या 28 डिसेंबरला सुनावणी […]
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) जाहीर सभेत शिवीगाळ केल्यामुळे ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. भांडुप पोलीस स्टेशनसमोरच हायहोल्टेज ड्रामा झाला. खासदार संजय राऊत ( Sanjay Raut)यांनी येथे येत या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर […]
मुंबई : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. […]
Supreme Court : राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. हरित लवादाने (Green arbitration) लावलेल्या 12 हजार कोटींच्या दंडाला स्थगिती देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापना (Solid waste management) प्रकरणी राज्य सरकारला हरित लवादाने 12 हजार कोटींचा दंड ठोठावला होता. या दंड प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. याला तात्पुरती स्थगिती […]
Uddhav Thackeray Press Conference : देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी परराज्यात आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, ते त्या ठिकाणी कोणत्या भाषेत बोलणार याची उत्सुकता आणि चिंता उद्धव ठाकरेंना […]