Ratan Tata : माझी तब्येत ठणठणीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; टाटांनी स्वतः दिली हेल्थ अपडेट
Former Tata Sons Chairman Ratan Tata Health Update : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची तब्येत बिघडली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता स्वतः रतन टाटा यांनी एक्सवर पोस्ट करत आपली तब्येत एकदम ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
रतन टाटांची पोस्ट नेमकी काय?
रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मात्र, आपली तब्येत एकदम ठणठणीत असून, नागरिकांनी अफवा असल्याचे रतन टाटा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच माझे वय 86 वर्षे असून, वयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे आपण नियमित तपासणीसाठी रूग्णालयात गेलो होतो असे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. “माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. चिंतेचे कारण नाही. माझी प्रकृती स्थिर आहे आणि विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.
Ratan Tata यांची अशीही भूतदया! एक आदेश अन् भटका कुत्रा ताजमध्ये निवांत झोपतो
तत्पूर्वी, रतन टाटा यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत, असा दावा केला जात होता की, त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता, म्हणून रतन टाटा यांना मध्यरात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे तसेच, त्यांच्यावर प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे वृत्त व्हायरल होते होते. मात्र, आता स्वतः रतन टाटा यांनीच X वर पोस्ट करून ही बातमी चुकीची असल्याचे आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी रूग्णालयात गेल्याचे स्पष्ट केले आहे.