“शरद पवारांवर आजिबात नाराजी नाही, आम्ही फक्त..”, शिंदेंवर निशाणा साधत राऊतांची नवी भूमिका

“शरद पवारांवर आजिबात नाराजी नाही, आम्ही फक्त..”, शिंदेंवर निशाणा साधत राऊतांची नवी भूमिका

Sanjay Raut on Sharad Pawar : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. या सत्कारावरून चांगलाच गदारोळ उडाला. संजय राऊत यांनी पवार साहेब राजकारण आम्हालाही कळतं असे म्हणत थेट शरद पवार यांच्यावरच टीका केली होती. यानंतर सत्ताधारी महायुतीसह शरद पवार गटातील नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. आता हा वाद आणखी वाढवायचा नाही अशी नमती भूमिका राऊतांनी घेतल्याचे दिसत आहे. आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला.. विनायक राऊतही संतापले

राऊत पुढे म्हणाले, शरद पवारांविषयी नाराजी असण्याचं काय कारण. शरद पवारांवर आजिबात नाराजी नाही. आम्ही फक्त एका विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली. महाराष्ट्र ज्याला गद्दार संबोधतो, ज्याने अमित शाहांशी हातमिळवणी करून बेईमानी करून सरकार पाडलं. त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणे हा शरद पवारांचा अपमान आहे. जे आता टीका करतात त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहिती नसावेत. शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. मी पवार साहेबांवर टीका केली नाही. मी फक्त पक्षाची भूमिका मांडली असे संजय राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग भाजपाचा गुलाम

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटीगाठींचा दौरा होता. आदित्य ठाकरे राहुल गांधी यांना भेटले. अरविंद केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो. आदित्य यांनी त्यांना सांगितलं निवडणुकीमध्ये हार जीत असली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. यापुढे कुठली पाऊल टाकावी यासंदर्भात आम्ही स्पष्ट करणार आहोत. आमच्याकडे निवडणूक आयोगाचे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे. मारकडवाडी ही तक्रार नाही का तिकडचं मॉक पोल का रोखलं. ईव्हीएमबाबत शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत असे संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत सगळेच शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणतात. बरच काही काही बोलतात तेव्हा यांच्या तोंडाला झाकण होते का? किती घाणेरड्या शब्दांत टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते? असा सवाल राऊतांनी केला. आम्हाला हे मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवार यांचाही पक्ष फोडला, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं. मी जी भूमिका मांडली ती शरद पवार यांची देखील भूमिका असायला पाहिजे.

शिंदेंनी ठाण्याच्या राजकारणाला दिशा दिली; दिल्लीत शरद पवारांकडून एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमनं

शिंदेंना भारतरत्न द्या, आमचं काहीच म्हणणं नाही

मी बोललो माझ्यात हिंमत आहे. तुम्ही अमित शहा यांच्या विषयी काय बोलत आहेत का, त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. डर्टी पॉलिटिक्स करणारी ही लोकं आहेत. एकनाथ शिंदे यांना भारतरत्न द्या, परमवीर चक्र द्यावं माझा इतकाच आक्षेप आहे की शरद पवार यांनी तिकडे जाणं हे महाराष्ट्राला रुचलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील रुचलं नाही. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिला की मान मिळतो. मोदी, शहा यांनी शिंदेंना भारतरत्न द्यावा आम्ही काय म्हणणार फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण द्यावा माझं काही म्हणणं नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube