भारतातील ‘या’ शहरात सर्वाधिक अब्जाधीश, दुसऱ्या अन् तिसऱ्या नंबरवर कोणतं शहर
Hurun Rich List 2024 : हुरून इंडिया रीच लिस्ट मध्ये पुन्हा एकदा मोठा खुलासा (Hurun Rich List 2024) करण्यात आला आहे. भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती देण्यात आली आहे. यानुसार मुंबई शहरात (Mumbai) सर्वाधिक अब्जाधीश राहतात. हूरून इंडिया रिच लिस्टमध्ये भारतातील अब्जाधीशांची लिस्ट जारी करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्यांदाच भारतातील ३०० पेक्षा जास्त अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांना (Mukesh Ambani) मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची संपत्ती ११.६ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्स (Adani Group) मध्ये तेजी आल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. भारताच्या कोणत्या शहरात सर्वाधिक अब्जाधीश राहतात याची माहिती देण्यात आली आहे. या लिस्टनुसार मुंबईत सर्वाधिक अब्जाधीश राहतात. तर हैद्राबादमध्ये १७ नावे अब्जाधीश शिफ्ट झाले आहेत. यामुळे आता हैद्राबादमध्ये एकूण अब्जाधीशांची संख्या १०४ झाली आहे. या यादीत हैद्राबाद शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे (Delhi) येथे २१७ अब्जाधीश राहतात. मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे येथे ३८६ अब्जाधीश राहत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
Gautam Adani यांना मोठा धक्का ! श्रीमंतांच्या यादीतून टॉप-20 च्याही बाहेर
या अब्जाधीशांची सर्वाधिक कमाई
हूरुन रिच लिस्टनुसार पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली, तिसऱ्या क्रमांकावर हैद्राबाद आहे. हैदराबादने बंगळुरूला मागे (Bengaluru) टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या उद्योजकांचा विचार केला तर गेरा डेव्हलमेंटचे प्रितमदास गेरा अँड फॅमिली आघाडीवर आहे. त्यांच्या संपत्तीत ५६६ टक्के वाढ झाली आहे. यामुळे वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती ठरले आहेत.
कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक पैसा
हुरुनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की उत्पादन क्षेत्रात जास्त पैसे कमावण्याची संधी दिली आहे. मनुफॅक्चरिंगशी संबंधित १०१६ उद्योजकांनी या वर्षात आपल्या संपत्तीत एकूण २८ लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. यानंतर औद्योगिक उत्पादन क्षेत्रात १४२ लोक, फार्मास्यूटीकल्स १३६ तर केमिकल्स अँड पेट्रो केमिकल्स १२७ उद्योजकांनी मोठी कमाई केली. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की भारतातील दीड हजार लोकांकडे एक हजार कोटींची संपत्ती आहे.
राधा वेम्बू सर्वात श्रीमंत सेल्फ मेड वूमन
यावर्षीच्या लिस्टमध्ये सेल्फ मेड प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये १००८ उद्योजकांचा समावेश आहे. मागील वर्षी ही संख्या ८७१ इतकी होती. सर्वात कमी वयाची सेल्फ मेड महिला उद्योजक लेंसकार्टच्या सहसंस्थापक नेहा बंसल आहेत. तर राधा वेम्बू या सर्वात श्रीमंत सेल्फ मेड वूमेन ठरल्या आहेत.
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत २१ वर्षीय कैवल्य वोहरा आहेत. जेपटो एक क्विक कॉमर्स स्टार्टअप आहे. ज्याचे व्हॅल्यूएशन ५ अब्ज डॉलर्स आहे. या स्टार्टअपचे सहसंस्थापक २२ वर्षीय आदित पालीचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर हर्षिल माथूर आणि शशांक कुमारही आहेत. जे रेजरपेचे सहसंस्थापक आहेत. दोघांचे वय ३३ वर्षांचे आहे.