Indian Railway Food : रेल्वेच्या जेवणातून माशा-झुरळं होणार हद्दपार; IRCTC चा हायटेक प्लान…
Indian Railway Food भारतीय रेल्वे नेटवर्कवर दरवर्षी अंदाजे 60 कोटी प्रवाशांना तर, दररोज सुमारे 18 लाख प्रवाशांना भोजन दिले जात आहे.
Indian Railway Food Quality : तुम्ही रेल्वेने प्रवास करताना कधी जेवणाच्या गुणवत्तेबद्दल साशंक असता का? पण, आता तुमच्या या काळजीला पूर्णविराम मिळणार आहे. कारण, IRCTC ने प्रवाशांच्या आरोग्याची आणि खाण्याच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलत थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. आता रेल्वेच्या प्रत्येक किचनवर एआय कॅमेऱ्यांचे 24 तास ‘वॉच’ असणार आहे.
Video : काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वेची गरूड भरारी; आयफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिजवर धावली रेल्वे
काय काय तपासले जाणार?
हे हायटेक एआय कॅमेरे 9 प्रकारच्या गंभीर त्रुटींवर लक्ष ठेवणार असून, यामध्ये प्रामुख्याने रसोयांनी हेअरनेट आणि हातमोजे घातले आहेत की नाही. उंदीर, माश्या किंवा झुरळे यांची किचनमध्ये उपस्थिती तसेच किचनमधील फरशी आणि परिसराची योग्य स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे एखादी छोटीशी चूक जरी कॅमेऱ्यात टिपली गेली तरी सिस्टम तात्काळ संबंधित किचन मॅनेजरला ‘अलर्ट’ पाठववते. जर वेळेत समस्येचे निराकरण झाले नाही, तर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवले जाते. साधारणपणे दोन तासांच्या आत जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाते. रेल्वेच्या कठोर भूमिकेमुळे 2023-24 मधील 7,026 तक्रारींची संख्या 2024-25 मध्ये 6,645 पर्यंत खाली आली आहे.
दररोज 18 लाख प्रवाशांना दिले जाते अन्न
सध्या भारतीय रेल्वे नेटवर्कवर दररोज सुमारे 18 लाख प्रवाशांना भोजन दिले जात आहे. तसेच भारतीय रेल्वे नेटवर्कवर दरवर्षी अंदाजे 60 कोटी प्रवाशांना भोजन दिले जात आहे. सध्या, वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि गतिमान एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांसह अंदाजे 1,453 गाड्यांमध्ये खानपान सेवा उपलब्ध आहे. त्याशिवाय मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आणि ट्रेनच्या बाजूला असलेल्या व्हेंडिंग सेवांद्वारेही भोजन पुरवले जात आहे.
फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा
चुकांवर ‘झिरो टॉलरन्स’
रेल्वेने आता स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अलीकडेच पाटणा-टाटानगर वंदे भारत ट्रेनमधील दह्याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाने IRCTC वर 10 लाख, तर पुरवठादारावर 50 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावून आपला ‘कडक’ बाणा दाखवून दिला आहे.