DRDO चा आम्हाला अभिमान; Mission Divyastra च्या यशानंतर पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

DRDO चा आम्हाला अभिमान;  Mission Divyastra च्या यशानंतर पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

Mission Divyastra of DRDO : मिशन दिव्यास्त्रच्या ( Mission Divyastra of DRDO ) यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणारे एक ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या मिशनच्या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार असल्याचं सांगितले जात होतं. मात्र हे संबोधन रद्द करण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे.

मराठा आरक्षणातील हिंसाचार चौकशीसाठी एसआयटी गठित; संदीप कर्णिकांवर जबाबदारी !

या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, मिशन दिव्यास्त्रसाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा आपल्याला अभिमान वाटत आहे. तर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री वेहिकल म्हणजेच एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी पार पडली आहे. असं म्हणत मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.

मिशन दिव्यास्त्र काय आहे?

मिशन दिव्यास्त्र हे एक असं मिशन आहे. ज्यामध्ये एकाच मिसाईलला विविध युद्ध स्थळांना निशाणा करण्यासाठी तैनात केले जाऊ शकते. ही प्रणाली स्वदेशी असून एव्हीऑनिक्स आणि उच्च अचूकता सेन्सर पॅकेज सह सुसज्ज करण्यात आली आहे. मिशन दिव्यास्त्रच्या या चाचणीमुळे भारत जगातील एम आय आर बी क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे.

लेट्सअप विश्लेषण : शिवतारे खरंच बारामतीमधून लढणार की, केवळ पोकळ आव्हान?

तर ज्या टेक्नॉलॉजीमध्ये एखाद्या मिसाईलमध्ये एकाच वेळी अनेक आण्विक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता असते. त्याला मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री वेहिकल म्हणजेच एमआयआरव्ही तंत्रज्ञान म्हटलं जातं. या शस्त्रांच्या सहाय्याने शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांना भेदले जाऊ शकतं. त्याचबरोबर या तंत्रज्ञानाची खासियत अशी आहे की, जमिनीवरून देखील हे मिसाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाऊ शकतं. या अगोदरच्या अग्नी मिसाईलमध्ये ही सुविधा नव्हती. मात्र आता अग्नि-5 या मिसाईलमध्ये हे तंत्रज्ञान देखील भारताला उपलब्ध झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube