दौरा पॅलेस्टाइनचा, हेलिकॉप्टर जॉर्डनचं अन् सुरक्षा इस्त्रायलच्या हाती; PM मोदींनी सांगितला खास किस्सा

दौरा पॅलेस्टाइनचा, हेलिकॉप्टर जॉर्डनचं अन् सुरक्षा इस्त्रायलच्या हाती; PM मोदींनी सांगितला खास किस्सा

PM Narendra Modi : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. या या यु्द्धाच्या झळा पॅलेस्टाइनला बसल्या आहेत. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजून तरी सकारात्मक परिणाम समोर आलेले नाहीत. भारतात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइन आणि इस्त्रायलबद्दल एक खास प्रसंग सांगितला आहे.

मोदी म्हणाले, ज्यावेळी मी पॅलेस्टाइनला गेलो त्यावेळी हेलिकॉप्टर जॉर्डनचे होते आणि इस्त्रायलची एअर फोर्स मला संरक्षण देत होती. तीन देश वेगळे आहेत मात्र तिन्ही देश मोदींच्या सुरक्षेत गुंतले होते. ज्यावेळी तुमचा हेतू प्रामाणिक असतो त्यावेळीच या गोष्टी घडतात. मी लपूनछपून कोणतीच गोष्ट करत नाही. अमेरिकेला सांगून आम्ही रशियाकडून पेट्रोल खरेदी केले. कारण देशाला स्वस्त दरातील तेलाची गरज होती. त्यामुळे आम्हाला कुणापासून काही लपवण्याची गर नव्हती असे पंतप्रधान मोदी यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार

मोदी पुढे म्हणाले, आपल्याकडे एक फॅशनच झाली होती की इस्त्रायलला गेलो की पॅलेस्टानचाही दौरा करायचा. पण मी असं काहीच केलं नाही. इस्त्रायचा दौरा केला आणि माघारीही आलो. मला ढोंग करण्याची काहीच गरज नाही. मी त्यावेळीच म्हटलं होतं की पॅलेस्टाइनला गेलो तर तो माझा स्वतंत्र दौरा असेल. त्यानंतर पॅलेस्टाइनचाही दौरा केला होता. जॉर्डनच्या राष्ट्रपतींच्या घरीही गेलो अशी आणखी एक आठवण मोदींनी सांगितली.

इस्त्रायल पॅलेस्टाइन युद्धावरही मोदींनी भाष्य केलं. मी माझ्या विशेष प्रतिनिधीला इस्त्रायलला पाठवलं होतं. रमजान महिन्यात गाझात बॉम्बफेक करू नका अशी विनंती या प्रतिनिधीमार्फत इस्त्रायलला केली होती. भारतात मला अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर घेरले जाते पण मी त्यावेळी गाझासाठी जे केलं त्याचा प्रचार कधी केला नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज