Nitin Kumar News : इंडिया आघाडीत (India Alliance) मोठी खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय. इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव समोर आल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, अधिकृतपणे नितीश कुमार नाराज असल्याचं समोर आलेलं नाही. नितीश कुमारांची इंडिया आघाडीत घुसमट होत […]
Rajasthan Politics : राजस्थानात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाने (Rajasthan Politics) येथील लोकांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पहिले आश्वासन पूर्ण करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 1 जानेवारी 2024 पासून उज्ज्वला गॅस सिलेंडर 450 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. राजस्थानातील टोंक येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]
Vijayakanth Passes Away : अभिनेता ते राजकारणी विजयकांत (Vijayakanth ) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना (corona) पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Actor […]
Year Ender 2023 : 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीयाला विसरताच येणार नाही. कारण याच (Year Ender 2023) दिवशी जगात कोणत्याच देशाने केली नाही अशी उत्तुंग कामगिरी करून दाखवली. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश होण्याचा मान भारताने मिळवला. सॉफ्ट […]
Bus Fire Accident : मध्य प्रदेशातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुना जिल्ह्यात (Bus Accident) कालरात्री डंपर ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस पेटली आणि या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यातील काही […]