Digital Payment Awareness Week : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI द्वारे दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट दिले आहेत. त्यांनी सांगितले की, एका वर्षात UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा 36 कोटींच्याही पुढे गेला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये हा आकडा 24 कोटी एवढा होता. आरबीआयच्या […]
मुंबई : आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्यासोबतच महिला आता उघडपणे कर्ज (Loan) घेत आहेत आणि एकूण कर्जदारांच्या संख्येत त्यांचा वाटाही वाढत आहे. TransUnion CIBIL च्या ताज्या अहवालानुसार, 2022 मध्ये 6.3 कोटी महिलांनी कर्ज घेतले आणि कर्जदारांमध्ये त्यांचा वाटा 28 टक्क्यांपर्यंत वाढला. अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत महिला कर्जदारांच्या संख्येत वार्षिक 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या काळात […]
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ या विषयावर आयोजित चर्चेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने त्यांना जागतिक समुदायासमोर खडसावले. (India Vs Pakistan On Kashmir) पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज […]
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]
कोहिमा : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड यांचा समावेश होता. यापैंकी नागालॅंड या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार […]
केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्ली सरकारमधील लोकांना अटक होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल हे आज सकाळपासून ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचं हे ध्यान काही मिनिट नाही तर तब्बल सात तास चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही दिवसापूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली […]