भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी दुपारी ब्रजराजनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. दास यांच्या छातीत 4-5 गोळ्या लागल्या असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, गोळीबार करणाऱ्या एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, […]
जम्मू : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. राहुल गांधी यांनी तेथे ठरल्याप्रमाणे ध्वजारोहण केले. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला […]
रायपूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Baba) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी दररोज मारहाण करीत होती, म्हणून त्यांनी देवाचा धावा केल्याचं […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून संपूर्ण देशवासियांशी संवाद साधला. 2023 या वर्षातील मन की बातचा आजचा पहिलाच भाग होता. पंतप्रधान मोदींनी आज तृणधान्याचं महत्व सांगितलंय. ज्वारी (Jowar)आणि बाजरी (Bajra)आरोग्यासाठी उत्तम असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्याचवेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेल्या पद्म […]
बेळगाव : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) तीन लढाऊ विमानांचा शनिवारी अपघात (Accident) झाला. त्यात दोन लढाऊ विमानांची एकमेकांत टक्कर झाली. नव्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका पायलटवर काळानं घाला घातलाय. बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी (Hanmantrao Sarathi)यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इतर दोन पायलट गंभीर जखमी झालेत. हवाई दलानं […]
नवी दिल्ली : इराणच्या (Iran) पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोया शहरात शनिवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे (Earthquake) मोठ्या प्रमाणावर विध्वंस आणि जीवित व मालमत्तेची हानी झाली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी मोजण्यात आली. या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 440 जण जखमी झाले आहेत. खोईशिवाय जवळपासच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या […]