CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. […]
Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) निवडणुकीच्या मैदानात […]
Atique Ahmad Patna Jama Masjid : गेल्या काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदची हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूनंतर बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पटना येथील रेल्वे जंक्शनजवळ अतिकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर रईस अन्सारी नावाच्या व्यक्तीने घोषणाबाजी […]
Atiq Ahamed Case : हत्या झालेल्या गुंड अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन हिच्या संभाव्य हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, प्रयागराज पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबत प्रयागराजच्या सीमेवरील गंगा कचर परिसरात मोठ्या प्रमाणात घरोघरी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान गावांमधील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शाईस्ता आणि इतर […]
Godhra Case : देशभर गाजलेले गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या या हत्याकांडातील 8 दोषींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडातील दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम […]
Delhi Saket Court Firing : दिल्लीतील साकेत कोर्टात शुक्रवारी सकाळी अचानक एका महिलेवर एका पुरुषाने गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. हातात पिस्तुल घेऊन वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही महिला धावत राहिली आणि हल्लेखोर तिच्या मागे धावत असताना गोळीबार करत राहिला. यावेळी संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. […]