भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच बड्या नेत्याचा राजीनामा?, बैठकांनाही दांडी

भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच बड्या नेत्याचा राजीनामा?, बैठकांनाही दांडी

Sunil Jakhar Resigns BJP : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काळातच भाजपला धक्का देणारी बातमी आली आहे. भाजपला हा धक्का पंजाबात बसला आहे. पंजाब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Suni Jakhar) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एक वर्षाआधी त्यांना भाजपने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या वरिष्ठांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. सुनील जाखड सध्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकांना हजर राहत नाहीत.

भाजपने 4 जुलै 2023 रोजी सुनील जाखड यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना ही जबाबदारी दिली होती. परंतु, आता 14 महिन्यांनंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार रवनीत बिट्टू यांना मंत्रिपद दिल्यामुळे जाखड नाराजा झाले होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही रवनीत बिट्टू यांना भाजपने मंत्रिपद दिले.

बिट्टू यांना भाजपने राजस्थानातून राज्यसभेवर पाठवले. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर जाखड मे 2022 रोजी भाजपमध्ये दाखल झाले होते. 2023 मध्ये भाजपने त्यांना पंजाब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केले होते. सुनील जाखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचे केंद्रीय नेतृत्वाने सध्या तरी टाळले आहे. पंजाब भाजप प्रभारी विजय रुपानी यांच्यानुसार सुनील जाखड नियमितपणे पक्षाच्या कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. सदस्यता अभियानातही जाखड सहभागी झाले होते. पुढील आठवड्यात राज्यात अनेक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सुनील जाखड सहभागी होणार आहेत.

अमेरिकेतून भारतात परतताच राहुल गांधींनी केलं आश्वासन पूर्ण; हरियाणातील तरुणाच्या घरी दिली भेट

सदस्यता अभियानाला दांडी

सुनील जाखड 10 जुलैनंतर पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर राहिलेले नाहीत असे सांगितले जात आहे. भाजप सदस्यता अभियानातही त्यांनी हजेरी लावली नाही. जाखड भाजपातील काही नेत्यांवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) पंजाबात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही तसेच पोटनिवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला.

सुनील जाखड 2002 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले होते. यानंतर 2007 आणि 2012 मध्ये सुद्धा आमदार झाले होते. 2017 मधील लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून खासदार झाले. अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर गुरुदासपूर जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने या मतदारसंघात जाखड यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत जाखड विजयी झाले होते.

लोकसभेला अजितदादा गटाची मते भाजपला मिळाली नाही; RSS नंतर फडणवीसही नाराज!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube