Stock Market: शेअर बाजाराची संथ सुरुवात; सेन्सेक्स थोडा घसरला, मिडकॅप निर्देशांकाचा नवा उच्चांक
Share Market : मंगळवारी (24सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी सुस्त झाली. (Share Market ) सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरत होता. त्याच वेळी, निफ्टी देखील घसरणीसह 25,900 च्या खाली उघडताना दिसला. निफ्टी बँकही जवळपास 100 अंकांच्या घसरणीसह 54,000 च्या वर व्यवहार करत होता.
कोणते शेअर्स घसरले?
आज मिडकॅप निर्देशांकाने पुन्हा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सुरवातीला सेन्सेक्स 68 अंकांनी घसरला आणि 84,860 वर उघडला. निफ्टी 18 अंकांनी घसरून 25,921 वर तर बँक निफ्टी 5 अंकांनी वाढून 54,110 वर उघडला. मेटल शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सवरील बहुतेक शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, कोटक बँक या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली असून त्यांना 1 टक्क्यांपर्यंत नुकसान सहन करावे लागत आहे.
किरकोळ बाजारातील दरवाढ रोखण्यासाठी कांद्याची ‘बफर स्टॉक’मधून विक्री; केंद्र सरकारचं मोठं पाऊल
इन्फोसिस व्यतिरिक्त, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या आयटी शेअर्समध्येही घसरण दिसत आहे. दुसरीकडे मेटल शेअर्स बाजाराला साथ देत आहेत. टाटा स्टील 2 टक्क्यांहून अधिक तेजीत आहे. JSW स्टील सुमारे 1.80 टक्क्यांहून अधिक तेजीत आहे. तसंच, सोमवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.15 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाले. S&P 500 निर्देशांकात 0.28 टक्के आणि तंत्रज्ञान केंद्रित निर्देशांक Nasdaq मध्ये 0.14 टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे.
कसा आहे गुंतवणूकदारांचा कल?
सार्वजनिक सुट्टीनंतर उघडलेला जपानचा निक्केई 1.47 टक्के आणि टॉपिक्स 1 टक्क्यांनी वर आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.6 टक्के आणि कोस्डॅक 0.68 टक्क्यांनी वधारत आहे. हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्स 2.18 टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट 1 टक्के वाढला आहे. त्याचबरोबर, NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 23 सप्टेंबर 2024 रोजी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच FII हे निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 404.42 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या काळात, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे DII देखील निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 1022.64 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.