शाहंनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लोकसभेत एक दिवस आधीच सांगितला होता; वाचा काय म्हणाले होते शाह

शाहंनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लोकसभेत एक दिवस आधीच सांगितला होता; वाचा काय म्हणाले होते शाह

Amit Shah : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व ७ आरोपींची एनआयए कोर्टाने (NIA Court) निर्दोष मुक्तता केली. कालच संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शा (Amit Shah) यांनी हिंदू दहशतवादी असू शकत नाही असं विधान केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast) प्रकऱणाचा निकाल आला असून या घटनेतील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या निकालाने यूपीए सरकारकडून वारंवार उल्लेख होत असलेल्या भगव्या दहशतवाद या शब्दाला खोटे ठरवलं गेलं आणि आणि गृहमंत्री शाहांचे शब्द खरे ठरले.

धक्कादायक! बार्शीत शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळली; रोहित पवारांच्या निशाण्यावर कोण? 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. काही विरोधी नेत्यांनी ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन शिवशक्ती यासारख्या नावांवर आक्षेप घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार रुची वीरा सारख्या लोकांनी आक्षेप घेतलाय की, या नावांनी सैन्याचे राजकारण केलं जातंय आणि त्याकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जातेय. त्यानंतर राज्यसभेत बुधवारी बोलताना गृहमंत्री शाह यांनी हिंदू दहशतवादावर भाष्य केलं. त्यांनी ऑपरेशन महादेव आणि हर हर महादेव सारख्या घोषणांचा उल्लेख करत विरोधकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. शाह यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की, काँग्रेसनं जाणूनबुजून भगवा दहशतवाद ही संज्ञा तयार केली. मी गर्वाने सांगू शकतो की, कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही, असं शाह म्हणाले.

शाह यांनी म्हटलं की, काँग्रेसने मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतातील जनतेने त्यांचे खोटे स्वीकारले नाही. काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचं राजकारण केले. पण, हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही असं शाह यांनी म्हटलं.

मंत्रिपदासाठी प्रयत्न पण मिळणार नाही, सुरेस धस आक्रमक; धनंजय मुंडेंवर टिकास्त्र 

शाह यांनी सैन्यात वापरल्या जाणाऱ्या इतर हिंदू देवी-देवतांच्या नावांनी दिल्या जाणाऱ्या घोषणांचा उल्लेख केला. त्यांनी सैन्याच्या शौर्याला हिंदू संस्कृतीच्या अभिमानाशी जोडलं आणि म्हटलं की, गोरखा रेजिमेंट किंवा मराठा लाईट इन्फंट्री सारख्या भारतीय सैन्याच्या अनेक रेजिमेंट जयघोष करताना हर हर महादेव किंवा जय माँ काली यासारख्या धार्मिक घोषणा वापरतात. त्यामुळं सैन्याचे मनोबल वाढतं, असं शाह यांनी म्हटलं.

ते म्हणाले, विरोधकांच्या राजवटीत बंदुका आणि काडतुसे तर सोडाच, सैन्याकडे हिवाळ्यात काडीपेटीच्या काड्याही नव्हत्या आणि घालण्यासाठी कपडेही नव्हते. आज मोदी सरकारच्या काळात, आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आपल्या सैन्याने अर्ध्या तासात पाकिस्तानची संपूर्ण हवाई संरक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली. जर पहलगाम हल्ला विरोधी पक्षाच्या कार्यकाळात झाला असता तर पाकिस्तानला खूप आधीच क्लीन चिट मिळाली असती. आजचा भारत दहशतवादी हल्ल्यांना कागदपत्रांनी नव्हे तर क्षेपणास्त्रांनी उत्तर देतो, असंही शाह म्हणाले होते. विरोधकांवर आरोप करताना शाह म्हणाले, त्यांनी मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जनतेनं हा खोटारडेपणा नाकारला.

 

 

 

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube