बंडखोरांना राष्ट्रवादीत नो एंट्री, चूक पदरात घ्यायला पदरही फाटला; अजितदादांनी मांडली स्पष्ट भूमिका…

  • Written By: Published:
बंडखोरांना राष्ट्रवादीत नो एंट्री, चूक पदरात घ्यायला पदरही फाटला; अजितदादांनी मांडली स्पष्ट भूमिका…

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेकांनी बंडखोरी करत शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं. ज्यांनी बंडखोर केली, त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे, असं ते म्हणाले.

सैफ अली खान हल्ला प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

अजित पवार गटाचे सध्या शिर्डी येथे नवसंकल्प शिबीर सुरू आहे. या शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मी पंतप्रधान यांना विचारले आपण किती वाजता सकाळी उठता. ते म्हणाले मी साडे तीन तास झोपतो. योगा करतो आणि शरीराला वेळ देतो. सर्व कुटुंबाची तपासणी करून घ्या असंही ते मला म्हणाले. मी देखील तुम्हाला हेच सांगतो की आरोग्य तपासून घ्या, असा सल्ला अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

बंडखोरांना राष्ट्रवादीत नो एंट्री…

ते म्हणाले की, विधानसभेच्या यशानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. पक्षात येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ज्यांची जनमानसात प्रतिमा मलिन आहे, त्यांना राष्ट्रवादीत नो एंट्री असणार. तसंच ज्यांनी बंड केलं होतं, ते चुकलं-चुकल म्हणून माझ्याकडे येत आहेत. मात्र कुणालाही पक्षात घेणार नाही. त्यांना देखील शिस्त म्हणजे काय हे कळायला हव. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणजे ना घरका, ना घाटका; पटेलांची एकाच वाक्यात व्याख्या.. 

ते म्हणाले, लोकसभेत पराभव झाला आणि विधानसभेत आम्ही यश मिळवले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या पराभवांचे खापर ईव्हीएम फोडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून ते फेक नरेटिव्ह पसरवत आहेत, अशी टीका अजितदादांनी निकाल चांगली की, ईव्हीएम चांगले आणि निकाल निराशाजनक लागली की, ईव्हीएम वाईट अशा बोंबा मारायच्या हे विरोधकांचे धोरण आहे, असंही ते म्हणाले.

धनंजय मुंडेबाबत काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आज शिबिरात भाषण करतांना धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, मला ठरवून टार्गेट केल जात आहे. पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असं त्यांनी म्हटलं. यावरून अजित पवारांनी मुंडे यांच्या बाबत जे वादळ उठलं होतं ते आज थांबवण्याच काम आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी केल आहे, असं म्हटलं.

अजित पवार पुढं म्हणाले की, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जे-जे इच्छुक आहेत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि २५ घरावर काम केल पाहिजे. म्हणजे एका घरात ४ मत धरली तर १०० मत मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने ५० कार्यकर्ते तयार केले तर आपण २० हजार मतापर्यत पोहोचू शकतो. प्रत्येकाने १०० मतांपर्यंत पोहोचायच आहे. अधिकाधिक तरुणांना पक्षात आणायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील यांना पक्षात आणायचं आहे. राज्यातील प्रत्येक गावात चौकात झेंडा लागेल पक्षाचा बोर्ड लागेल याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube