आम्ही सकारात्मक, दोन्ही नेते लवकरच भेटतील…; ठाकरे बंधुंच्या भेटीबाबत परबांचे मोठे विधान

Anil Parab : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. दोन्ही नेते लवकर भेटतील, चर्चा करतील आणि पुढचं ठरवतील, असं परब (Anil Parab) म्हणाले.
शिरूर बसस्थानकावर गर्दीचा घेतला आधार; दोन महिलांनी पाच लाखाचे दागिने चोरले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असं मराठी लोकांच्या मनात आहे. विशेष म्हणजे यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. चर्चेची दार आम्ही कधीच बंद केली नाहीत. दोन्ही प्रमुख नेते भेटतील, चर्चा करतील आणि ठरवतील. दोन्ही नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढं जाऊ, निवडणुका जवळ येताच दोन्ही नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे. ते दोघे बसतील आणि ठरवतील, असं परब म्हणाले.
आम्ही चर्चेसाठी सकारात्मक
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सांगितंय की, सगळे वाद बाजूला ठेऊन सोबत यायला तयार आहोत. राज ठाकरेंनी ठरवायचं आहे आमच्यासोबत यायचे की नाही?,महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत, असंही परब म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यावरून परब यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शेवटी भाजपने आपल्या भूमिकेला तिलांजली दिली. भाजप कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी जीवाचं रान केलं. त्यांना दुःखी ठेवत, इतरांना संधी दिली जात आहे, अशी टीका परब यांनी केली. तसंच पालकमंत्रीपद आणि वेगवेगळी गणितं मांडण्यात सरकारचा वेळ जातोय, असंही ते म्हणाले.
मुंबईपालिकेत आरक्षणाचा विषय नाही
पबर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेटं दिलंय, त्यानुसार उर्वरित महाराष्ट्राबाबत ओबीसींचा निर्णय न्यायालयाने लावला आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका त्यांना 4 महिन्यात घ्याव्या लागलीत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आरक्षणाचा विषय नाही. इथे फक्त जागा २२७ असतील की २३६ हाच प्रश्न होता. यावर कुठलाही स्टे नाही. उद्या ते निवडणूक घेऊ शकतात. त्यांचा प्रशासक बसला आहे हवं ते करु शकतात. प्रशासकाच्या माध्यमातून हवं तसे काम त्यांना करता येते, मुंबई महापालिका लुटता येते, अशी टीका परब यांनी केली.