महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ; नाना पटोले यांचं विधान

महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ; नाना पटोले यांचं विधान

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी

Ramesh Chennithala And state president Nana Patole Press conference : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Assembly Election 2024) सुरू आहे. काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी महायुतीवर घणाघात केलाय.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने प्रगती केली नाही उलट दुर्गती झालीय. महिलांवरील अत्याचार वाढला. 13,009 महिला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात बेपत्ता झाल्या आहेत. महायुती सरकारच्या काळात 38 टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं देखील पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

ही निकालानंतरची विजयी सभाच…राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचं भव्य शक्तीप्रदर्शन

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतकाँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील महाभ्रष्ट युतीला वाचवण्यासाठी दिल्लीतील नेते येत आहेत. महाराष्ट्रातील एटीएम वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. आमची चर्चा सुरू आहे.

महायुतीत जागावाटपामध्ये गडबड झाल्याने हेलिकॉप्टरने एबी फॅार्म पाठवले आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी ही लढाई आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा नाही. ‘दोस्ती करो तो पुरी करो’ ही आमची भुमिका आहे. महायुतीत भाजप शकुनी सारखे काम करतेय, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केलीय. सिंचन घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले की, अजित पवार हे आज आबांबद्दल बोलत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर बोलत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असंही पटोले म्हणाले आहेत.

आव्वाज कुणाचा? राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना..

शिंदे सरकारकाळात लूट झाली आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढतेय. निवडणूक तोंडावर असताना योजना आणल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले, त्यांची अंबलबजावणी होणार नाही. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. भाजपाने या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार यांचे अस्तित्व संपवले आहे. शिंदे आणि पवार गटातून भाजपाचे उमेदवार निवडणूक लढवीत आहे. मात्र, महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. महाविकास आघाडीत बंडखोर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही, असं आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube