‘मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी’ व्हिडिओ व्हायरल होताच लोणीकरांनी केली सावरासावर, म्हणाले…
Babanrao Lonikar Reaction After Statement On Maratha Voters : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातील (Assembly Election 2024) भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढलेल्या दिसत आहे. सध्या भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील होतेय. विधानसभा निवडणुकीचं मतदान आठ दिवसांवर आलेलं असताना हा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळतंय. परंतु व्हिडिओ व्हायरल होताच बबनराव लोणीकर यांनी सावरासावर करत माफी देखील (Maratha Voters) मागितली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये बबनराव लोणीकर यांचं विधान आहे की, या गावामध्ये अठरापगड जातीचे लोक असून मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी आहे. मात्र हे गाव सर्व समाजाचं असून सर्व जाती-धर्माचे लोकं आमच्यासोबत आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी सगळे आहेत, असं लोणीकर म्हणाले होते. हा व्हिहिओ व्हायरल होताच लोणीकरांनी स्पष्टीकरण देत सावरासावर केलीय.
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर बबनराव लोणीकर म्हणाले, मराठा समाजाची मतं या गावात कमी आहेत, असं मी माझ्या भाषणात म्हणाले आहे. एससी, एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लीम, अल्पसंख्याक, अठरापगड जातींचं हे गाव आहे. परंतु 40 वर्षे या गावाने भाजपला मताधिक्य दिलंय.”
मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील
मला मराठा समाजाची 60 ते ७० टक्के मतं मिळतात. भाजपला मिळतात. परंतु, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा खोटारडेपणा असल्याची टीका लोणीकरांनी केलीय.मला मतदारसंघामध्ये 40 वर्षे मराठा, माळी, मुस्लीम, एससी, एसटी, व्हिजेएनटी, ओबीसी, अठरापगड जातीचे लोक 25 हजारपेक्षा जास्त मतांनी का निवडून देतात? कारण माझं काम आहे”, असं देखील बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय.