अजितदादा रात्री दीड वाजता बीडला… कलेक्टरांनी रातोरात केल्या नऊ हजार सह्या

Beed Guardian Ministe Ajit Pawar: रविवारी अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून बीडाला पहिलाच दौरा झाला पण तो ही मध्यरात्री दीड वाजता.

Ajit Pawar beed gurdian minsister

Beed Guardian Ministe Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) बीडमध्ये काय करणार? जे पुण्यातील कोयता गँग रोखू शकले नाहीत, ते बीडला (Beed) काय कंट्रोल करणार? अजितदादा पालकमंत्री असले तरी सिंहासनावर पादुका ठेवून धनंजय मुंडेच कारभार करणार अशा एक ना अनेक कमेंट दोन दिवसांपासून सोशल मिडियात आहेत. पण अजितदादा काय करू शकतात? याची चुणूक त्यांनी एकाच दौऱ्यातून दाखवून दिली आहे. रविवारी अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून बीडाला पहिलाच दौरा झाला पण तो ही मध्यरात्री दीड वाजता. मात्र याच दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तब्बल नऊ हजार सह्या करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. आता हे आदेश अजितदादांनी दिले होते की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पातळीवर हा निर्णय घेतला ते या दोघांनाच माहिती. पण अविनाश पाठक आक्रमक दिसत आहेत हे तरी नक्की आहे….नेमकं काय घडलं या दौऱ्यात? पाहुया…

Datta Khade Exclusive : कराडमुळे गोत्यात आलेल्या खाडेंनी ‘CID’ अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं!

बीडचे पालकमंत्री पद स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतले आहे. रविवारी मध्यरात्री अजितदादा पवार लातूरहून नियोजित दौरा आटोपून जालन्याकडे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना ते बीडला आले. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला. पालकमंत्री बीडमार्गे पुढे जाणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी तयारी केलेली होती. प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दादांना रिसीव्ह करण्यासाठी थांबविण्यात आले होते. दादांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ते पुढे गेले.

Sanjay Shirsath : जे संपलेत त्यांच्यावर बोलून काय होणार; पालकमंत्री शिरसाटांचा खैरे, दानवेंना टोला

याच दौऱ्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अवैधरित्या वाळू उपसा करुन तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना दोन हजार नोटीसा बजावल्या आहेत. यासाठी त्यांनी तब्बल नऊ हजार सह्या केल्या.
अजितदादा पवार हे त्यांच्या शिस्त आणि कठोर निर्णयामुळे परिचीत आहेत. नियमांच्या बाबतीत ते कधीच मागे- पुढे पहात नाहीत. एकदा घेतलेले निर्णय दादा पुन्हा फिरवत नाहीत आणि नियम पाळणाऱ्या अधिकार्‍यांच्या पाठीशी ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात असा त्यांचा अनुभव आहे.

असे अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले असल्यामुळे जिल्हा प्रशासनालाही बळ मिळाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. मुळे यापुढे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या कुठलीच कामे होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्येही वाळू माफियांना नोटीस बजावून दंड ठोठावला होता. पण माफियांनी या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन नोटीसला आव्हान दिले होते. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाला म्हणणे मांडण्याचे आदेश जारी केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने कोर्टातच सदरील दंडाच्या नोटीसा मागे घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली तर नोटिसा मागे घेतल्या नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली होती.

परिणामी उच्च न्यायालयाने सर्व काही मुभा दिली आणि आपला न्यायालयात विजय झाला आहे, अशा अविर्भावात वाळू माफिया पुन्हा हजारो ब्रास वाळू उपसा करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र प्रशासनाने या सर्व वाळू माफियांना पुन्हा मोठा दणका दिला आहे. एका टिप्परने इतक्या ट्रीप केल्या त्या प्रत्येक ट्रीपला वेगळी नोटीस देण्यात आली आहे. अशा दोन हजार नोटीसा 40 वाळू माफियांना बजावण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ९ हजारापेक्षा जास्त कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. भविष्यातही कायदेशीर कारवाई अधिक कडक करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube