‘इंडिया’तील सर्व पक्ष आपापले वेगळं गाणं गाताहेत, ही आघाडी पुढं…; फडणवीसांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
‘इंडिया’तील सर्व पक्ष आपापले वेगळं गाणं गाताहेत, ही आघाडी पुढं…; फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis On India Alliance: ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) आता तोंडावर असतांना इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला (BJP) पराभूत करू शकते, असं म्हणत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) भाजप विरोधात एकला चलो रे ही भूमिका घेतली. दरम्यान, इंडिया आघाडीतील घडामोडींवरून आता देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी इंडियावर टीका केली.

IND vs ENG : रविचंद्रन अश्विन अन् रवींद्र जडेजानं रचला इतिहास, ‘या’ फिरकीपटूंच्या नावावर अनोखा विक्रम… 

सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. मात्र, अद्याप इंडिया आघाडीमध्ये लोकसभेचं जागावाटप झाला नाही. जागावाटपावरू कॉग्रेस आणि त्या त्या राज्यातील रिजनल पक्ष यांच्यात मेळ झाला नाही. त्यामुळं इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख स्वबळावर लढण्याचे निर्णय घेत आहे. काल ममता बॅनर्जी इंडियातून बाहेर पडल्या आहेत. तर आपही स्वबळावर निवडणुका लढवेल, असं पंजाबचे सीएम भगवंत मान यांनी सांगितलं. दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना फडणवीस यांना इंडिया आघाडीविषयी विचारले असता त्यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, इंडिया आघाडी ही मुळात आघाडीच नाही. देशातील सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या आघाडीतील सर्व पक्ष आपापले वेगळं गाणं गात आहेत. आणि समूहगाण होईल, अशी त्यांची इच्छा आहे. पण, समूहगाण गाण्यासाठी कोरसमध्ये गावे लागते. एकाच गाणं गाव लागतं. एकाच सुरात आणि एकाच दिशेने गावं लागतं. मात्र, आघाडीतील घटक पक्षांचे नेते आपापल्याच सुरात गात आहेत. त्यामुळं इंडिया आघाडीत फुट पडलेली दिसतत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

Pune गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बाणेरमध्ये बड्या हॉटेलांमधून 11 महिलांची सुटका

फडणवीस म्हणाले, खरंतर एकाचवेळी सर्वांनी गाऊन चालत नाही. इंडिया आघाडीतल प्रादेशिक पक्ष आणि कॉंग्रेसची त्या त्या राज्यात थेट स्पर्धा आहे. त्यामुळं प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसला आपला वाटा देणार नाहीत. आपली व्होट बॅंक कॉंग्रेसकडे जाऊ नये, याची काळजी प्रादेशिक पक्ष घेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी चालेलं असं मला कधीही वाटलं नाहीही. या आघाडीवर मला पहिल्यापासून शंकाच होती. पुढेही ही आघाडी चालणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

तर काल प्रशांत किशोर यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. इंडिया आघाडीतल पक्षांमध्ये ऐक्य नाही, एकमेकांना मदत करण्याची इच्छाशक्ती नाही. या आघाडीतून काहीही साध्य होणार नाही, असं ते म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube