…तर अडीच वर्षात काय-काय होत होतं सगळं काढेल; फडणवीसांचा राऊतांना इशारा
Devendra Fadnavis Warn Sanjay Raut on Pune Drugs : पुन्हा एकदा पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री होत असल्याने पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यात संजय राऊतांनी ( Sanjay Raut) या प्रकरणी फडणवीसांना (Devendra Fadnavis) जबाबदार धरल्यानंतर फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर देत राऊतांना मविआच्या अडीच वर्षांच्या काळातील ड्रग्जबाबतच्या गोष्टी समोर आणण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी काहीही केलं नाही. त्यांचं देखील राज्य होतं मात्र त्यांच्या काळात पोलिस विभागाची कसे धिंडवडे निघाले? तसेच शंभर कोटींची वसुली कशी झाली? हे सगळ्यांनी बघितलं आहे. आमची पॉलिसी देशभरात झिरो टॉलरन्सचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य एकत्रित काम देखील करत आहे. त्यामुळेच अशा प्रकारची प्रकरण बाहेर येत आहेत. त्यामुळे ड्रग्ज संदर्भात आणखी बराच काही कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे विरोधकांनी याचे राजकारण करू नये. तसेच त्यांना राजकारणच करायचं असेल तर आम्ही देखील त्यांच्या अडीच वर्षात ड्रग्स बाबत काय-काय होत होतं आम्ही सांगू. मात्र हा प्रश्न राजकारणाच्या पलीकडचा आहे. असं म्हणत यावेळी ड्रग्स वरून आरोप करणाऱ्या संजय राऊतांना इशारा दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
गुजरात हे ड्रग्स चे सर्वात मोठं केंद्र आहे. मुद्रापोर्ट हजारो कोटीचा ड्रग्स तिकडे उतरत आहेत. काही पकडले जात आहे. काही महाराष्ट्रात वळवला जात आहे. आणि हे सगळे कोण आहेत? राजकीय संरक्षण कोणाच आहे याचा तपास होणं गरजेच आहे. हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला आहे काही वर्षात. त्यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते? कोण पोलीस आयुक्त होते. पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे.
VIDEO: जय भीम, जय पॅलेस्टाइन…शपथ घेतल्यानंतर ओवेसींची सभागृहातच घोषणा; भाजपकडून विरोध
तसेच पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचा सर्वात मोठा केंद्र बनला आहे. पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं. आज पुण्यात दुर्दैवाने गुन्हेगारी अमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातील होऊ पाहत असेल त्याला जबाबदार या राजाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या त्या वेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी ते या सगळ्यांला जवाबदार आहे.