अचानक मतदान कसं वाढलं? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं खरं कारण
Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) विरोधकांकडून ईव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली जात असल्याचं चित्र आहे. मतदान 5 वाजेनंतर कसं वाढलं? अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जात आहे. विरोधकांच्या आरोपांनंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम (S Chockalingam) यांनी खरं कारण स्पष्ट केलंय. मतदानाच्या दिवशी 5 वाजेनंतर जे मतदार उभे होते त्यांनी रात्री उशिरापर्यंत मतदान केलंय, महाराष्ट्र आणि झारखंडच्या तुलनेत महाराष्ट्रात उशिरापर्यंत मतदान होत असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलंय. यासंदर्भातील व्हिडिओ निवडणुक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलायं.
सेक्स वर्कर्सनाही मिळणार प्रसूती रजा, पेन्शन अन् आरोग्य विमा, जाणून घ्या नवीन कायदा
यावेळी बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले,महाराष्ट्रात जवळपास 1 लाख मतदान केंद्रे होते. या मतदान केंद्रामध्ये प्रत्येक तासाला 60 ते 70 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. झारखंडमध्ये मतदान सकाळच्या वेळेत लवकरच मतदान करतात. त्यामुळे झारखंडमध्ये 5 वाजेपर्यंतच मतदान सुरु असतं. महाराष्ट्र मोठं राज्य असून महाराष्ट्रात 6 वाजता मतदान बंद करण्यात आलं. त्यावेळी रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांनी उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
गृहखातं पदरात पडलं की, भाजपचा गळा दाबायला शिंदेंना वेळ लागणार नाही; सुषमा अंधारे
मतदान प्रक्रियेच्या आधी आम्ही मशीन तपासून घेत असतो. मतदानाच्या आधीच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावून ईव्हिएम मशीनची तपासणी केली जाते, ज्या उमेदवाराच्या मतदान दिलं जात त्याची व्हिव्हिपॅट बरोबर येते की नाही? जेवढे मतदान केलं जातं त्याची मोजणी योग्य आहे की नाही? याची तपासणी झाल्यानंतर राजकीय प्रतिनिधींची स्वाक्षरीही घेतली जाते, असं निवडणूक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
दरम्यान, निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला काही काही आक्षेप असेल तर उमेदवार ईव्हिएम मशीनच्या चेकिंगसाठी अर्ज करु शकतो, अशी तरतूद आहे, उमेदवार मशीनच्या तपासणीसाठी दहा दिवसांच्या आत अर्ज करु शकतो, असंही चोक्कलिंगम यांनी सांगितलंय.