रायगडावर जा… अन् नाक घासून माफी मागा, राहुल सोलापूरकरांवर शंभूराज देसाई संतापले
Shambhuraj Desai Reaction On Rahul Solapurkar : मागील काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) हे चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाये. राहुल सोलापूरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी केली जातेय. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट करत माफी मागितली होती. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलीय.
राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, तर रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक घासून माफी मागवी, असे खडेबोल शंभूराज देसाई यांनी राहुल सोलापूरकर यांना सुनावले आहेत, त्यांनी रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी अशी मागणी देखील केलीय. तर राज्यातील शिवप्रेमींमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळं मोठी संतापाची लाट आहे.
“आरक्षणाशिवाय एक इंचही मागे हटणार नाही”, मनोज जरांगेंचा मेगा प्लॅन काय?
यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. पालक मंत्र्यांवर कुरगोडी करण्यासाठी भाजपाने संपर्क मंत्री नेमले, असं म्हणणे चुकीचे आहे. भाजपचे संपर्क मंत्री हे संघटना वाढीसाठी आहे, त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा काढणं चुकीचं आहे. त्यांनी संजय राऊत यांना चुकीची चिट्टी काढणारा पोपट असं म्हटलंय. ते म्हणाले की, राऊत यांची पावले मेंटल हॉस्पिटलकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी. सुमोटो, फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील शंभूराज देसाई यांनी केलीय.
उमेश पाटलांची घरवापसी; पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, म्हणाले..मी दादांना
काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर समाजातील चौफेर बाजूंनी टीका झाली. त्याचं झालं असं की, राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका औरंगजेबाच्या लोकांना लाच देऊन करून घेतल्याचा दावा सोलापूरकरांनी केला होता. अखेर यावरून अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितलीय.