‘…तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू’, जयंत पाटलांचं मोठं विधान

‘…तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू’, जयंत पाटलांचं मोठं विधान

Jayant Patil : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड केल्यानंतर ते महायुतीसोबत गेले. अजित पवारांच्या पक्षाने महायुतीसोबत लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) लढवली आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे.

रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, महिन्याला मिळणार 44,900 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज? 

जयंत पाटील हे आज नाशिकच्या येवल्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेला देशाचे संविधान वाचवायचे आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता प्रंचड त्रासलेली आहे. जीएसटी कराची आकारणणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असताना गॅस, पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. यामुळे जनता त्रस्त झाली असून महाविकास आघाडी हा महत्त्वाचा पर्याय असल्याचे लोकांना वाटते. त्यामुळेच आमच्या 32 ते 35 जागा निवडून येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Rajkumar Rao च्या मिस्टर अँड मिसेस माहीचं पहिलं गाणं रिलीज; अनोख्या व्हर्जनची प्रेक्षकांना भूरळ 

जयंत पाटील म्हणाले की, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे नवे चेहरे समोर आले असून तरुण मंडळी चांगल काम करत आहे. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले.

नगर, नाशिक, जळगाव, पुणे यासह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गेल्या सहा महिन्यांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज काहीतरी आश्वासन देतील, त्याला काही अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेली असून लाल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासनही सरकार पूर्ण करू शकलं नाही. उलट खर्च दुप्पट झाल्याची टीका त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसांत सर्व प्रकारचा अवलंब केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोग डोळे झाकून बसला आहे. तक्रार करूनही पोलीस प्रशासन आणि निवडूक आयोग काहीच करत नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज