रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, महिन्याला मिळणार 44,900 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, महिन्याला मिळणार 44,900 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

Konkan Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच कोकण रेल्वेने (Konkan Railway) विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कसा करावा? भरतीचे निकष काय? निवड पद्धत आणि अर्जाची अंतिम तारीख याच विषयी जाणून घेऊ.

Rajkumar Rao च्या मिस्टर अँड मिसेस माहीचं पहिलं गाणं रिलीज; अनोख्या व्हर्जनची प्रेक्षकांना भूरळ 

एकूण पदे – 42 रिक्त पदांसाठी भरती होणार

पदांचा तपशील
कोकण रेल्वेत खालील पदांसाठी भरती होणार आहे –
EE/करार या पदासाठी एकूण तीन पदांची भरती केली जाईल.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण तीन पदांची भरती केली जाईल.
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 15 पदांची भरती केली जाईल.
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण चार पदांची भरती केली जाईल.
डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदांसाठी एकूण दोन पदे भरली जातील.
तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 15 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

शैक्षाणिक पात्रता
EE/करार –
या पदासाठी उमदेवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

एका फतव्यावर विरोधकांचं 90 टक्के मतदान, मोदींसाठी सुस्ती सोडा! महाजनांची साद 

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल पद
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ITI (Draughtsman (Electrical))/डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे.

डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वेतन-

EE/करार – 56,100 रुपये
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल- 44,900 रुपये
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल -35,400 रुपये
डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल -35,400 रुपये
तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – 25,500 रुपये

कोकण रेल्वेची अधिकृत वेबसाईट लिंक –
https://konkanrailway.com/

अधिसूचना –
https://konkanrailway.com/uploads/vacancy/1715260364Electrcial_dept_Notification-Contract_-Final.pdf

अर्ज सुरू होण्याची तारीख – 05-०6-2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21-06-2024

मुलाखतीचा पत्ता-
एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.वरील नोकऱीच्या मुलाखती 5 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान आयोजित केल्या जातील.
मुलाखतीला जाताना उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज