जयंत पाटलांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, राजीनामाच्या वक्तव्यावर कोल्हेंचं स्पष्टीकरण

जयंत पाटलांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, राजीनामाच्या वक्तव्यावर कोल्हेंचं स्पष्टीकरण

Amol Kolhe : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 25 वर्धापन दिन नगर शहरात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. (Amol Kolhe) इच्छुकांनी केवळ चार महिने थांबावं असं देखील ते यावेळी  म्हणाले आहेत. मात्र, जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा गैर अर्थ काढू नये त्यांनी केलेले वक्तव्य निवडणुकीच्या अनुषंगाने होतं अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

विधान चर्चेत  मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?

नगर शहरात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार आमदार तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील मोठं विधान केलं. येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. मात्र, त्यापूर्वीच जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत केलेले विधान हे चांगलं चर्चेत येऊ लागलं आहे.

माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत

मंचावरून भाषण करताना जयंत पाटील म्हणाले होते की, माझ्या बाबत काही तक्रार असेल तर जाहीरपणे तसंच, ट्विटर वरती मांडू नका थेट शरद पवारांना सांगा हवं तर ते माझ्यावरती कारवाई करतील. जाहीरपणे वक्तव्य करणं टाळावं अस आव्हान देखील जयंत पाटील यांनी केलं. तसंच, पुढे बोलताना ते म्हणाले की माजी प्रदेशाध्यक्ष पदाचे महिने मोजू नका. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे. अवघे चार महिने थांबा मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत असा टोलाही त्यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला आहे. मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेल. नोव्हेंबरनंतर पदावर नसेल असं देखील सूचक विधान जयंत पाटील यांनी केले होतं.

त्या वक्तव्याचा गैर अर्थ काढू नये

जयंत पाटील यांनी जाहीर मंचावरूनच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर यावरती बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, पुढील चार महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून पाटील यांनी राग व्यक्त केला आहे. तरी आपण कुणीही  त्याचा गैर अर्थ काढू नये असं आवाहन देखील यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज