भाजप पक्ष पळवतो अन् मविआ छोट्या पक्षांची मत घेऊन बाजूला करतो; कपिल पाटलांची टीका

भाजप पक्ष पळवतो अन् मविआ छोट्या पक्षांची मत घेऊन बाजूला करतो; कपिल पाटलांची टीका

Kapil Patil Criticize MVA on MLC Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) महायुतीने (Mahayuti) महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे जर महाविकास आघाडीचे मतं फुटले नसते तर या निवडणुकीत महायुतीला विजय मिळवता आला नसता आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. त्यात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी देखील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

ओवैसी – जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार, अनेक चर्चांना उधाण

कपिल पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव धक्कादायक आहे. मविआने मुंबईत शिक्षक भरतीची सीट घेतली. राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देऊन पराभव केला. भाजप पक्ष पळवतो तर तुम्ही पण तसेच का वागत आहात? डावे आणि वंचित पक्ष जवळ घ्यायचे आणि नंतर दूर लोटायचे आहेत. मविआने निर्णय घ्यायचा आम्हाला सोबत ठेवायचं की नाही. छोट्या पक्षांनी मविआला मदत केली.

नारायण राणेंच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान; ठाकरे गटाकडून याचिका दाखल

नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधान सदस्य होते. त्यांच्या नातवाला म्हणजे जयंत पाटील यांना त्यांचा शताब्दी अगोदर असं बाहेर काढणं चांगलं नाही. ते सहज निवडून आले असते. राजू शेट्टी यांना ही यांनी दूर केले आहे. गावित यांची फसवणूक केली. शिक्षक भारतीची जागा लाटली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबई शिक्षक मतदार संघ तुमचा मग ऐनवेळी असं का केलं? लोकसभा निवडणुकीत लोकांनी निकाल दिला तो डोक्यात जाऊ देऊ नका.

मी दिमागाने खेळतो, फडणवीस, शिंदे, अजितदादांना डावात हरवलं, शांतता रॅलीत पाटलांचा हल्लाबोल 

राज्यात अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मते हवीत पण त्यांना बाजूला बसवायला नको. उद्धव ठाकरे आणि कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. मात्र आम्ही खंत व्यक्त केली आहे, आता ते काय निर्णय घेतात पाहू. धर्म निरपेक्ष लोकांविरोधात आम्ही जाणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube