- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”
Uddhav Thackeray on Vishal Patil : सांगलीत नक्की ठरलंय. काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. आता ते लिफाफा घेऊन मतदारांत जाणार आहेत. सांगली हा काँग्रेसचा गड. ठाकरे गटाची ताकद येथे नगण्य. तरीदेखील काँग्रेसच्या नाकावर टिच्चून हा मतदारसंघ ठाकरेंनी खेचला. उमेदवारही दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जागा परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. उद्धव […]
-
हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा; निवडणुकीआधीच मिळाली क्लीनचिट
Maharashtra News : राज्यात गाजलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी निगडीत कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नाही, असे या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.आर्थिक गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा […]
-
CM शिंदेंसाठी मुंबई अवघडच! शिंदेंच्या मनातील ‘त्या’ दोन नावांना ‘मनसे’चा तीव्र विरोध
Maharashtra Lok Sabha Election : महायुतीत अजूनही काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. यामध्ये मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईतील सहापैकी दोन मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येतील असे सांगितले जात आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्या नावांना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधामुळे मुख्यमंत्री एकनाथ […]
-
ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री
Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा निवडणुकीत आज वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक आता तिरंगी झाली आहे. वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज उत्कर्षा रुपवते सकाळी राहता येथे निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्कर्षा रुपवते यांनी मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट […]
-
‘निवडणुकीनंतर ठाकरेंचे दहा आमदार फुटणार’; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Narayan Rane on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रचारही तापू लागला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा (Ratnigiri Sindhudurg) अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवत भाजपने येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना (Narayan Rane) तिकीट दिलं आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. याच […]
-
धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
Ahmedngar Youth kidnapped three girls : राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एका वीस वर्षीय तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत […]










