पुणे : आधी देशातील विरोधी पक्षनेतृत्व संपवले. मग स्वतःच्याच पक्षातील नेतृत्व संपवले. कारण भाजपमध्ये मोदींनंतर दुसरा नेता कोण, हे कोणालाच समजत नाही, असा थेट आरोप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची वाटचाल ही हिटलर शाहिकडे सुरु आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. तसेच […]
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. या दिवशी निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर […]
पुणे : स्वतंत्र्यावीर सावरकर हे सर्वांचे हिरो आहेत. याबद्दल दुमत नाही. त्यांनी अंदमानमध्ये यातना भोगल्या हेही खरे आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदू महासभेने त्याकाळी सातारा, सांगली, कोल्हापूर, कारवार, निपाणी या परिसरातील क्रांतीकारकांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. हे विसरून चालणार नाही. नेमके हेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना माहिती नाही. त्यांनी आधीचे सावरकर पकडले नाही. तर केवळ […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचं सख्य जगजाहीर आहे. मात्र, शरद पवार यांच्या या भूमेकेमुळे महाविकास आघाडीला कमी आणि भारतीय जनता पार्टीला जास्त फायदा होत आहे. त्याला कारणीभूत शरद पवार यांची भूमिका आहे. कारण ते हात दाखवतात डावीकडे अन जातात उजवीकडे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा […]
पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मानव यांचा मुलगा हिंजवडी परिसरात असताना हा धमकीचा मेसेज आल्याने भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी कायद्या अंतर्गत सूर्यप्रताप नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागेश्वर […]
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची (Strike)हाक दिली आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Higher and Technical Education)स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. बऱ्याचदा निवेदनं, भेटी, बैठका व आंदोलन होऊन देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं […]