नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. हे मंदिर पुढील आठ दिवस बंद असणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. […]
मुंबई : राज्यात थंडीचा जोर कायम असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं हजेरी लावलीय. सध्या वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसताहेत. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र चांगलाच धास्तावलाय. या पावसामुळं हातातोंडाशी आलेलं पीक वाया […]
मुंबई : पोलीस दलाच्या इतिहासात मोठी घटना आज राज्यात घडली आहे. अती प्रतिष्ठित अशा मुंबई पोलीस आयुक्त या पदाच्या समकक्ष असलेल्या “विशेष पोलिस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आलं आहे. पोलीस सह आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवता, यावे यासाठी हे पद निर्माण केल्याचं शासनाने म्हटलं आहे, तर पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा […]
पुणे : मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विधानपरिषदेच्या ५ जागांपैकी ३ उमेदवार जवळपास निश्चित […]
रत्नागिरी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्तीवर ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे. अनिल परबांच्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यांची एकूण 10.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. यासंदर्भात ईडीकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आलीय. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद […]
पुणे : सध्या धर्मवीर नाव कोणीही कोणाला देतंय, तर काही जण चित्रपट काढत आहेत, धर्मवीर नाव कोणालाही देत आहेत. मात्र, स्वराज्यरक्षक दुसरं कोणाला म्हणता येणार नाही कारण, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा […]