राज्यात तिसरी आघाडी! जयंत पाटलांची बच्चू कडूंना खुली ऑफर, म्हणाले..,

राज्यात तिसरी आघाडी! जयंत पाटलांची बच्चू कडूंना खुली ऑफर, म्हणाले..,

Jayant Patil : लोकसभा निवडणुकीनंतर राज्याला आता विधानसभा निवडणुकीचं वेध लागलंय. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झालीयं. अशातच आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) खुली ऑफर दिलीयं.

Video : संजय गायकवाडांना शिंदे-फडणवीसांसमोर अजितदादांनी झाप-झाप झापलं!

जयंत पाटील म्हणाले, बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात एका आघाडी तयार केली आहे. पण आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

गामी विधानसभेच्या दृष्टीने राज्यात रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत. अशातच राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे तिसऱ्या आघाडीची घोषणा केली. परिवर्तन महाशक्ती असं या तिसऱ्या आघाडीचं नाव आहे.

5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..

पुण्यात आज तिसऱ्या आघाडीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिसरा पर्याय देण्याविषयी चर्चा कऱण्यात आली. या बैठकीनंतर व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा करण्यात आली. यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हटले की, महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube