पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, […]
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे […]
नागपूर – महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार २५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला ३ हजार १३ सरपंच व इतर १ हजार ३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४ हजार १९ सरपंच निवडून […]
नवी दिल्ली : जगावर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचे संकट येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा फक्त चीन मध्येच नाहीत जगातील इतर अनेक देशात जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं देखील सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख […]
नागपूर : शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहेत, त्याबाबत सरकारनं काही उपाययोजना केल्यात का? त्याचबरोबर अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर […]
नागपूर : ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात […]